रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७
रविवार, २९ जानेवारी, २०१७
शनिवार, २८ जानेवारी, २०१७
कांचनसंध्या
कांचनसंध्या
कवी बा.भ.बोरकर यांची ही एक अतिशय सुंदर कविता.
आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा मुलं-बाळं मार्गी लागलेली असतात, जगाचे भले बुरे अनुभव घेऊन झालेले असतात, त्यावेळी उदासी येण्याऐवजी आयुष्याकडे सकारात्मक कसे बघावे हे ही कविता शिकवून जाते…..
👇
पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,
आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.
कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,
तिमिर दाटता बनुनि चांदणें
तीच उमलतील संथपणे.
सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं.
उभ्या जगाचे अश्रु पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणें
पोसूं तटिची म्लान तृणें.
इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी-तळी,
असू तिथे सखि! ओला वट मी आणिक तूं तर देव-तळी.
शिणुनी येती गुरें-पाखरें
तीच लेकरें जाण सखे,
दिवस जरेचे आले जरी
त्या काठ जरीचा लावू सुखें...!
– बा.भ. बोरकर

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७
उद्देश
नमस्कार वाचकहो,
"डिजिटल मराठी" नावावरून थोडं आश्चर्य वाटेल पण हो.... मराठी साहित्य हे केवळ जुन्या लोकांपर्यंतच मर्यादित न राहता ते नव्या पिढीपर्यंत नव्या माध्यमांतून नव्या संकल्पनेने पोहोचावे असा आमचा उद्देश आहे आणि म्हणूनच नावात देखील सहजता ठेवली आहे. मराठी साहित्य हे आम्ही आपल्यासमोर blog, facebook page तसेच YouTube channel च्या माध्यमातून मांडणार आहोत. यामधील पहिला भाग हा " मराठी कवितांचा" आहे.
यामध्ये अजून ब-याच नवनवीन, भन्नाट कल्पना वापरण्याचा आमचा विचार आहे....त्यामुळे आपणा सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहोत. धन्यवाद 🙏
शर्वरी पर्वते.
संकल्पना : ओंकार जाधव व शर्वरी पर्वते

निवडुंग
निवडुंग
आवडणारे सखे सोबती , अवतीभवती ..
शब्दाशब्दावरती माझ्या , जीव जडवुनी,
असती ऐकत, हासत खिदळत ..
आणिक मीही बोलत असते ,
किति भरभरूनि ..
पूर्ण मोकळी स्वतःस करुनि ..
निरभ्र सारे ..
निळे, निरागस, निर्मळ, लोभस ..
कधी नव्हे ते अद्भुत घडते ....
मनामनांचे पोत रेशमी ,
हळु उलगडते ..
आणि उमलते ,
एक निकटपण.......
तोच अचानक मधेच दचकुन
पुन्हा थांबते
वाक्य अकारण जरा लांबते ..
ओठांवरती शब्द अधिक जो उमटू बघतो ..
आवेगाने , फिरून तया परतविते मागे ..
मनाआडचे एक गूढ मन होते जागे
म्हणते मजला , ' थांब जराशी '
आणिक नंतर सरसर वाढत वेढत ओढत
माझ्या भवती दाटुन येते,
निवडुंगाचे काटेरी बन ...
अस्तित्वाला पडते कुंपण ..
आणि एकटी ,
एकटीच मी , पूर्ण एकटी ,
कुंपणात त्या...
पडते कोंडुन .....
शांता शेळके .
आवडणारे सखे सोबती , अवतीभवती ..
शब्दाशब्दावरती माझ्या , जीव जडवुनी,
असती ऐकत, हासत खिदळत ..
आणिक मीही बोलत असते ,
किति भरभरूनि ..
पूर्ण मोकळी स्वतःस करुनि ..
निरभ्र सारे ..
निळे, निरागस, निर्मळ, लोभस ..
कधी नव्हे ते अद्भुत घडते ....
मनामनांचे पोत रेशमी ,
हळु उलगडते ..
आणि उमलते ,
एक निकटपण.......
तोच अचानक मधेच दचकुन
पुन्हा थांबते
वाक्य अकारण जरा लांबते ..
ओठांवरती शब्द अधिक जो उमटू बघतो ..
आवेगाने , फिरून तया परतविते मागे ..
मनाआडचे एक गूढ मन होते जागे
म्हणते मजला , ' थांब जराशी '
आणिक नंतर सरसर वाढत वेढत ओढत
माझ्या भवती दाटुन येते,
निवडुंगाचे काटेरी बन ...
अस्तित्वाला पडते कुंपण ..
आणि एकटी ,
एकटीच मी , पूर्ण एकटी ,
कुंपणात त्या...
पडते कोंडुन .....
शांता शेळके .
परिचित अपरिचित मराठी कविता
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.
याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा..
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
~आरती प्रभू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)